
140 नंदागांव बुद्रुक मध्ये बाजारातील भेसळीमुळे विषबाधा
बातमी थोडक्यात
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील नंदागांव बुद्रुक येथे आठवडी बाजारात भेसळयुक्त अन्नपदार्थ खाल्ल्याने 140 जणांना विषबाधा झाली आहे. यात मोठ्या प्रमाणात लहान मुले आहेत. चिंचवड, डोंगरगाव या परिसरातील नागरिक यात बाधित झाले आहेत. सर्व रुग्णांना वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे.