
बालवाडी शिक्षकांचे तीन महिन्यांचे मानधन अद्याप बाकी
बातमी थोडक्यात
बालवाडी शिक्षकांचे तीन महिन्यांचे मानधन अद्याप बाकी असून सणासुदीच्या काळात आर्थिक ताण वाढला आहे. सुमारे २१०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचेही पगार बाकी आहेत. स्थायी समितीने मुदतवाढीचा प्रस्ताव मंजूर केला, पण अद्याप आदेश जारी झालेला नाही.