
नवी पेठेत एम. पी. एस. सी. च्या विद्यार्थ्यांचे अनिश्चित काळासाठी आंदोलन
बातमी थोडक्यात
एम. पी. एस. सी. चे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यातल्या एम. पी. एस. सी. च्या विद्यार्थ्यांनी नवी पेठेतल्या एस. एम. जोशी पुलावर २ ऑक्टोबरपासून अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन पुकारले आहे. २७ सप्टेंबर रोजी विद्यार्थी प्रतिनिधी, पोलीस अधिकारी आणि आमदार रोहित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरला धरणे आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली आहे. भीमनवार यांच्या कार्यकाळात प्रश्नपत्रिका फुटल्याने विद्यार्थी अधिक आक्रमक झाले असून काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला आहे.