
शेअर बाजारात मोठी घसरण; निफ्टी २३ हजारांच्या खाली
बातमी थोडक्यात
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून निफ्टी २३ हजारांच्या खाली तर सेन्सेक्स १६१ अंकांनी खाली आला आहे. बीएसईवरील बाजार भांडवल ४७८.६८ लाख कोटी रुपयांवर घसरल्याने गुंतवणूकदारांचे सुमारे ३.२ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. परदेशी गुंतवणूकदारांनी ३४ हजार ६९३ कोटी रुपयांचे शेअर्स विकले तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी २ हजार ८३८ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.