
बागणीत प्लास्टिकमुक्त गाव अभियान सुरू
बातमी थोडक्यात
वाढत्या प्लास्टिक प्रदूषणास आळा घालण्यासाठी सरपंच तृप्ती संदीप हवीलदार यांनी वाळवा तालुक्यातील बागणीत प्लास्टिकमुक्त गाव अभियान सुरू केले. ग्रामपंचायत प्लास्टिक कचरा दहा रुपये किलो दराने खरेदी करणार आहे, तर विद्यार्थी व शिक्षक जनजागृतीसाठी मॉर्निंग वॉक करणार आहेत. या अभियानाद्वारे प्रदूषण कमी करणे, आरोग्य सुधारणे, स्वच्छता वाढवणे यासह सिंगल यूज प्लास्टिक हद्दपार करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात येणार आहेत.