रत्नागिरी जिल्हा आधार पडताळणीत द्वितीय
बातमी थोडक्यात
रत्नागिरी जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीचे ९८.२१ टक्के प्रमाण असून रत्नागिरी जिल्हा राज्यात द्वितीय क्रमांकावर आहे. पडताळणी प्रक्रियेत संगमेश्वर व लांजा तालुक्यांनी आघाडी घेतली असून केवळ २,५४९ विद्यार्थ्यांची पडताळणी बाकी आहे. आगामी काही महिन्यांत आधार पडताळणीत जिल्हा अव्वल स्थानी जाण्याच्या मार्गावर आहे.