
महाराष्ट्रात घाट परिसरात गडगडाटी वादळाची शक्यता
बातमी थोडक्यात
२८ सप्टेंबर रोजी पुणे व सातारासह मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. या भागातील नागरिकांनी विजांच्या धोक्यामुळे खबरदारी घ्यावी. २९ व ३० सप्टेंबर रोजीही मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.