
महाराष्ट्रात दुर्गम विद्यार्थ्यांसाठी १०० मिडी बसची भर
बातमी थोडक्यात
दुर्गम भागातील आदिवासी आणि विद्यार्थ्यांसाठी वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी १०० मिडी बसची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. या बसमुळे विद्यार्थी आणि आदिवासी समाजाला शिक्षण व आरोग्य सेवा अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध होतील. ज्या दुर्गम मार्गांवर मोठ्या बसची सोय नाही, अशा मार्गांवर या बसची सुरुवात होईल.