
गडचिरोलीतील २३ गावासाठी २५९ कामे प्रस्तावित
बातमी थोडक्यात
जलयुक्त शिवर अभियानांतर्गत गडचिरोलीतील २३ गावासाठी २५९ कामे प्रस्तावित असून त्यापैकी १६१ गावे जलसंपन्न आहेत. उर्वरित २३ गावे जलसंपन्न करण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. कामांसाठी ६१४. ५९ लाख रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे. प्रलंबित प्रस्तावांतील त्रुटी दूर करून ते तातडीने मार्गी लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी दिले.