
मुंबईहून दसरा-दिवाळी प्रवासासाठी 418 विशेष गाड्या
बातमी थोडक्यात
दसरा, दिवाळी आणि छठ पूजेच्या निमित्ताने मुंबईहून आपल्या मूळ गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने 418 विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. कोल्हापूर, लातूर, पुणे, हडपसर, नागपूर, मडगाव या ठिकाणी विशेष गाड्या धावणार असल्याने प्रवाशांना सणासुदीच्या काळात अधिक सोयीस्कर प्रवासाचे पर्याय उपलब्ध होणार आहेत. विशेष गाड्यांसाठी आरक्षण 27 आणि 28 सप्टेंबरपासून सुरू होईल.