
संपाच्या पार्श्वभूमीवर रविवारी बँका सुरू
बातमी थोडक्यात
पाच दिवसांचा आठवडा मागून २८ सप्टेंबरपासून बँक कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. ग्राहक सेवा सुरळीत राहावी यासाठी २७ सप्टेंबर रोजी रविवार सार्वजनिक क्षेत्रातील आणि ग्रामीण बँका सुरू राहतील. सोमवार २८ सप्टेंबरपासून तीन दिवस संप सुरू राहील. त्यानंतर दोन दिवस सुट्टी असेल.