
बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महावितरणकडून वीज ग्राहकांना २८ सप्टेंबरपूर्वी ऑनलाईन बिल भरण्याचे आवाहन
बातमी थोडक्यात
बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वीज ग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी ऑनलाईन बिल भरण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. २८ ते ३० सप्टेंबर या काळात बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. चेकद्वारे होणारे पेमेंट या काळात विस्कळीत होणार असून ग्राहकांनी विलंब शुल्क टाळावे. ज्या ग्राहकांच्या खात्यात 'प्रॉम्प्ट पेमेंट'ची सवलत आहे, त्यांनी २८ सप्टेंबरपूर्वी डिजिटल पद्धतीने बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.