
कोल्हापूर दुष्काळ: ६ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर
बातमी थोडक्यात
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पडलेल्या राधानगरी, गगनबावडासह सहा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. कमी पाऊस पडलेल्या शिरोळ, हातकणंगले यांना वगळल्याने शेतकरी नाराज आहेत. मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या पावसाच्या आकडेवारीच्या आधारे २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.