
दुष्काळग्रस्त पिकांची पाहणी करत पंकजा मुंडे
बातमी थोडक्यात
दुष्काळात सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, असे आश्वासन मंत्री पंकजा मुंडे यांनी परळी तालुक्यातील पांगारी येथे दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतांची पाहणी करताना दिले. नुकतीच ३२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर करण्यात आली असून बीड व जालना जिल्ह्यांची पाहणी करण्याचे नियोजन सुरू आहे. दुष्काळ निवारणाबाबत लवकरच ठोस उपाययोजना जाहीर करण्यात येणार आहेत.