
१५ दिवसात तलाठ्यांकडून पिकांची पाहणी
बातमी थोडक्यात
पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने १५ दिवसात पिकांची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी तलाठ्यांना दिले. तालुक्यानुसार पिकांची स्थिती वेगवेगळी असून काही तालुक्यात हलक्या जमिनीत पिकांची स्थिती खराब आहे. तलाठ्यांनी शेतात जाऊन पिकांची पाहणी करून अहवाल सादर करायचा आहे.