
नारगाव व चिकलठाणा येथे ७३५ अनधिकृत भूखंड उध्वस्त
बातमी थोडक्यात
नारगाव व चिकलठाणा येथील ७३५ अनधिकृत भूखंडांच्या सीमा अतिक्रमण विभागाने हटवून भूखंडांसाठी बांधलेले काँक्रीटचे रस्ते उध्वस्त केले. अनधिकृत भूखंड व रस्ते हटवल्याने रहिवाशांना फटका बसला. बेकायदा भूखंडांविरोधात कठोर कारवाई करत नियमितीकरण मोहीम सुरू आहे.