
गणेश विसर्जन पुणे: रांगोळीतून व्यसनमुक्तीचा संदेश
बातमी थोडक्यात
अनंत चतुर्दशीला पुण्यातील गणेश विसर्जन सोहळा सुरू असून भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. मिरवणुकीच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्यांच्या नक्षीकामामुळे जनजागृती होत असून नागनाथ पार येथील विशेष रांगोळी विशेष लक्ष वेधून घेत आहे. तरुणांना व्यसन टाळण्याचा संदेश या कलाकृतीतून देण्यात आला आहे.