
अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनासाठी ३६ कृत्रिम विसर्जन स्थळे सज्ज
बातमी थोडक्यात
अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या सुरक्षित विसर्जनासाठी शहरात ३६ कृत्रिम विसर्जन स्थळे तयार करण्यात आली आहेत. गर्दी, वाहतूक आणि प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी या तलावांचा वापर करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदवले यांनी केले. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ३५० सार्वजनिक मंडळांतील गणपती विसर्जित होणार आहेत.