
दिल्ली-बेळगावची विमानसेवा आता रोज
बातमी थोडक्यात
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. राममोहन नायडू यांच्या भेटीनंतर खासदार जगदीश शेट्टार यांच्या विनंतीवरून इंडिगोची दिल्ली-बेळगाव विमानसेवा १ ऑक्टोबरपासून आठवड्यातून सात दिवस सुरू होणार आहे. दिल्ली आणि बंगळुरू या दोन्ही शहरांशी बेळगावची हवाई संपर्क वाढणार असून प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. येत्या काही दिवसांत इंडिगो संध्याकाळची सेवा रोज सुरू करणार आहे.