
आर्थिक हव्यासापोटी अमोघसिद्धी मंदिरापाशी तरुणावर हल्ला
बातमी थोडक्यात
गिरगाव येथील अमोघसिद्धी मंदिरापाशी शिवाजी शिंगाडे यांच्यावर चाकूने हल्ला करून मारहाण करण्यात आली. त्यांना चेहऱ्यावर १६ ते १७ टाके लागले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या तक्रारीवरून उमाडी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.