
महाराष्ट्रात पशुधन विमा योजना सुरू
बातमी थोडक्यात
राज्य सरकारने पशुधन विमा योजनेला मंजुरी दिल्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पशुधन विम्याद्वारे आर्थिक स्थैर्य मिळणार आहे. या विम्यामध्ये दुभत्या गायींसाठी ७० हजार रुपयांपर्यंत आणि म्हशींसाठी ८० हजार रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना १५ टक्के प्रीमियम भरावा लागणार आहे. शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळवण्यासाठी त्यांच्या पशुधनाची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर १२ अंकी युनिक नंबरसह करावी लागणार आहे.