
नाशिक शहरात जमावबंदी
बातमी थोडक्यात
नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले असून ते २६ सप्टेंबर २०२६ च्या मध्यरात्रीपासून ते १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत लागू राहतील. मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ (१) (३) अंतर्गत जारी करण्यात आलेल्या या आदेशात काही गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले आहेत, परंतु विवाह, धार्मिक विधी, चित्रपटगृहे सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अंतर्गत कारवाई करण्यात येईल.