
गरंबी धरण पर्यटन विकास प्रस्तावित
बातमी थोडक्यात
पावसाळ्यात पर्यटकांची वाढती मागणी लक्षात घेता मुरुड तालुक्यातील गरंबी धरणाचा पर्यटन विकासासाठी विचार केला जात आहे. पुणे-कोल्हापूर परिसरातील पर्यटक पावसाळ्यात प्रसिद्ध असलेल्या हिरव्यागार मुरुड गरंबी मार्गावरून प्रवास करतात. धरणातून होणारा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह आणि 'व्हिक्टोरिया ज्युबिली वॉटर वर्क्स' हे नाव या धरणाला पर्यटकांचे आकर्षण बनवते.