
साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणात प्रा. केदारे यांना अटक करण्याची मागणी युवक काँग्रेसची
बातमी थोडक्यात
साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी युवक काँग्रेसने गांधी भवन येथे पत्रकार परिषद घेतली. आयआयटी पवई येथील विद्यार्थ्यांना जातीच्या आधारावर त्रास दिला जात असून करिअर उध्वस्त करण्याची धमकी दिली जात आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब व शिष्टमंडळाने मुंबईचे सह पोलीस आयुक्त मनोज कुमार शर्मा यांची भेट घेतली व साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणात संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.