
गणेश विसर्जन २०२६: मिरवणुकीसाठी रस्ते बंद
बातमी थोडक्यात
२५ सप्टेंबर २०२६ रोजी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी प्रमुख वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात येणार असून सकाळी ०७:०० पासून मुख्य व दुय्यम रस्त्यांवर सर्व वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशानंतर सुभाष भुजंग यांनी हा आदेश जारी केला आहे. सिडको-हॅडको, टीव्ही सेंटर, जुने शहर या प्रमुख भागांमध्ये मिरवणुकीचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रस्ते बंद करण्यात येणार आहेत.