
सुरगाणा शहरात स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम सुरू
बातमी थोडक्यात
सुरगाणा शहरात २४ सप्टेंबर रोजी स्वच्छता ही सेवा अभियान व सेवा संकल्प अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वामी समर्थ मठ, देवीपाडा, खोकर तळासह परिसरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कचरा, घाण उचलून स्वच्छता मोहीम राबविली. सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळे स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी सामूहिक जबाबदारीने काम करावे, असे आवाहन नगरपंचायतीने केले.