
'राजा परत आला'चा जयघोष करत संभाजीनगरमध्ये आरोपींची रॅली
बातमी थोडक्यात
अपहरण प्रकरणात नुकताच जामिनावर सुटलेला गुन्हेगार सिडको पोलीस स्टेशन जवळ रामलीला मैदानात 'राजा परत आला'चा जयघोष करत रॅली आणि गुंडगिरी करताना पकडला गेला. रामलीला मैदान एन-७ सिडको समोर रस्त्यावर रॅली आणि गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी स्वतःहून दखल घेत ११ जणांवर आणि २-३ अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.