
संजय राऊत यांनी अमित शहा हे ज्ञानेश कुमार यांचे बॉस असल्याचा आरोप केला.
बातमी थोडक्यात
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निष्पक्षपणे काम न करता सरकारला झुकते माप दिल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी थेट त्यांच्यावर हल्ला चढवला. दोन निवडणूक आयुक्तांनी अलीकडील निर्णयांवर आक्षेप घेतल्याने अमित शहा हे कुमार यांचे बॉस असल्याचा दावा राऊत यांनी केला. अंतिम निर्णय तीनही आयुक्तांच्या मंजुरीने एकमताने घेतल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.