
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पनवेलजवळ बस जळली
बातमी थोडक्यात
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पनवेलजवळ गुरुवारी सकाळी भरधाव वेगाने जाणाऱ्या प्रवासी बसला आग लागली. अग्निशमन दल आणि देवदूत बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. या घटनेमुळे वाहतूक संथ झाली असून पोलीस या घटनेच्या कारणांचा तपास करत आहेत.