
ग्राम रोजगार सहाय्यकांना मिळणार ८ हजार रुपये मानधन
बातमी थोडक्यात
ग्राम रोजगार सहाय्यकांच्या मानधन व सेवाशर्तींचा प्रलंबित प्रश्न शासनाने निकाली काढला. मृदा व जलसंधारण विभागाने जारी केलेल्या नवीन नियमावलीत दरमहा ८ हजार रुपये मानधन व वार्षिक १० हजार पेक्षा जास्त मनुष्य दिवस काम करणाऱ्यांना २ टक्के प्रोत्साहन भत्ता देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ३० जून २०२७ पर्यंत हे बदल प्रायोगिक स्वरूपात राहतील. या काळात कामगिरीचे मूल्यांकन केले जाणार आहे.