
गोकुळ निवडणूक: ५८ उमेदवारांचे अर्ज अवैध
बातमी थोडक्यात
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ 'गोकुळ'ने निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेत ५८ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवले. बुधवारी निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. नियमावलीचे पालन न केल्याने अर्ज नाकारण्यात आले. काही उमेदवारांनी त्रुटी सुधारण्यासाठी वेळ मागितला आहे. अवैध अर्ज आणि पात्र उमेदवारांची अधिकृत माहिती गुरुवारी जाहीर करण्यात येणार आहे.