
अर्थसंकल्प 2027-28 पूर्व बजेट बैठका सुरू झाल्याने तयारी सुरु
बातमी थोडक्यात
केंद्र सरकारने 2027-28 च्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू केली असून 12 ऑक्टोबरपासून पूर्व बजेट बैठका सुरू झाल्या आहेत. 13 नोव्हेंबर रोजी संपणार असलेल्या या बैठकांमध्ये सुधारित खर्चाचा अंदाज आणि निधीची आवश्यकता यावर आढावा घेतला जाईल. 23 सप्टेंबर रोजी सर्व मंत्रालयांना वेळापत्रक पाठवण्यात आले असून 6 ऑक्टोबरपर्यंत आर्थिक आकडेवारी सादर करावी लागणार आहे.