
पगार न मिळाल्याने जळगाव जीएमसी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
बातमी थोडक्यात
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दोन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने तातडीने पगार देण्याची मागणी करत धरणे आंदोलन केले. आंदोलनामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून कर्मचाऱ्यांनी डीन कार्यालयाबाहेर घोषणाबाजी केल्याने रुग्णालयाचे कामकाज विस्कळीत झाले. कर्मचाऱ्यांनी दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत पगार न मिळाल्यास काम बंद पाडण्याचा इशारा दिला.