
नागपूर विमानतळावर आता प्रवेशासाठी चेहरा ओळखण्याची सुविधा
बातमी थोडक्यात
जीएमआर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाने आपली डिजी यात्रा प्रणाली अपग्रेड करून सिंगल स्टेप फेस रेकग्निशनची सुविधा दिली आहे. त्यामुळे प्रवाशांना बोर्डिंग पास स्कॅन न करता विमानतळावर प्रवेश करता येणार आहे. प्रवाशांना या ॲपवर नोंदणी करावी लागेल आणि बोर्डिंग पास शेअर करावा लागेल. या अपग्रेडमुळे विमानतळाच्या प्रवेशद्वारावर लागणाऱ्या रांगा आणि प्रतीक्षा वेळ कमी होणार आहे.