
भोकरदन मध्ये बंदी घातलेला पान मसाला जप्त
बातमी थोडक्यात
ताडेगाव जवळ २२ सप्टेंबर रोजी मोटारसायकल मधून बंदी घातलेला सुवासिक पान मसाला व जर्दा जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकारी विनोद किष्टू ओसावर यांच्या तक्रारीवरून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जप्त केलेल्या सामागात दुचाकीचा समावेश आहे. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे.