
सातारा : जिल्हा परिषदेच्या वतीने गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात
बातमी थोडक्यात
पर्यावरण संरक्षणावर भर देत मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आल्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची सांगता झाली. डीजेच्या आवाजाऐवजी पारंपरिक ध्वनींचा वापर करण्यावर भर देत डॉ. प्रिया शिंदे यांनी ढोल वाजवत मिरवणुकीत सहभाग घेतला. परंपरा आणि पर्यावरणपूरकतेचा समतोल साधण्यावर या कार्यक्रमात भर देण्यात आला.