
महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; 29 जिल्ह्यांना यलो अलर्ट
बातमी थोडक्यात
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा अधिक सक्रिय झाल्याने महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट सुरू झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण वाढणार असून यासह 29 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.