
डॉ. ए. एच. साळुंखे यांना डी. लिट. पदवी प्रदान
बातमी थोडक्यात
प्रख्यात विचारवंत व साहित्यिक डॉ. ए. एच. साळुंखे यांना डी. लिट. पदवी प्रदान करण्याची घोषणा कुलगुरू डॉ. अंकुश कदम यांनी केली आहे. २६ सप्टेंबर रोजी महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पदवी प्रदान सोहळा होणार आहे. ज्ञानक्षेत्रातील सर्वोच्च सन्मान म्हणून डी. लिट. पदवीला मान्यता आहे.