
परभणीत दुष्काळ खोटी सांगून माजी जिल्हा परिषद सदस्यांवर गुन्हा दाखल
बातमी थोडक्यात
दुष्काळग्रस्त तालुक्याबाबत चुकीची माहिती पसरवल्याप्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान सनाप व राजेश फड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फड यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमुळे गंगाखेड तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचा आरोप करत तुळशीराम संभाजी पोळे यांनी २० सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.