
अमरावतीसह पाच जिल्ह्यांमध्ये निवडणूक आचारसंहितेमुळे विकासकामे ठप्प
बातमी थोडक्यात
विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाल्याने आचारसंहिता लागू झाली असून निकाल जाहीर होईपर्यंत एक महिना विकासकामे ठप्प राहणार आहेत. आचारसंहितेत जाहीर सभा, मेळावे बंद राहतील, नवीन प्रकल्पही सुरू होऊ शकणार नाहीत. २७ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचे निकाल लागणार आहेत.