
उत्तर सोलापूर तालुक्यातील करंबा येथील दुष्काळग्रस्त पिकांची पाहणी करणार मुख्यमंत्री
बातमी थोडक्यात
करंबा येथील दुष्काळग्रस्त उडीद पिकांची पाहणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असून मुख्यमंत्री करंबा येथील दुष्काळग्रस्त उडीद पिकांची पाहणी करणार आहेत. सोयाबीन, मूग या पिकांचे दीर्घकाळ दुष्काळामुळे वाळले असून काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. प्राथमिक पाहणीनंतर पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून मदत देण्याची सरकारची योजना आहे.