
धारशिवमध्ये पिकाच्या नापिकीमुळे शेतकऱ्यांचे महामार्ग रोको आंदोलन
बातमी थोडक्यात
धारशिवमध्ये खरीप हंगामातील पिकाच्या नापिकीमुळे येडशी येथील छत्रपती संभाजीनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहने रांगेत उभी होती. परतणाऱ्या पावसासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याची प्रक्रिया राबवावी, अशी आंदोलकांची मागणी होती.