
राज्य मंत्रिमंडळाने दुष्काळ निवारण उपसमिती स्थापन केली
बातमी थोडक्यात
दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाने उपसमिती स्थापन केली असून दुष्काळ निवारण करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. मोगरपाडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना थेट मदत व विकसित जमीन वाटप करण्यात येणार आहे. येत्या शनिवारी प्राथमिक दुष्काळ अधिसूचना काढण्यात येणार आहे.