
जालना शहरातून सिटी बस सेवा सुरू
बातमी थोडक्यात
जालना शहरातून सिटी बस सेवेचा सोमवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी रावसाहेब दानवे व अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते शुभारंभ झाला. सार्वजनिक वाहतूक वाढविण्याची विनंती खोतकर यांनी परिवहन मंत्र्यांना केली. जालना ते इंदेवाडी, रामनगर, नागवाडी या मार्गांवरून विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आदींना लाभ होणार आहे. यापुढेही सेवा विस्तार करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.