
बस ब्रेक फेल्युअर कोठारे जवळ टळले
बातमी थोडक्यात
शहापूर तालुक्यातील कोठारे गावाजवळ तीव्र उतारावर बस ब्रेक फेल झाल्याने बस दरीत कोसळण्याच्या स्थितीत असल्याने एकच खळबळ उडाली. चालक अनिल साबळे यांनी तत्परतेने बसला संरक्षक भिंतीवर वळवल्याने मोठा अपघात टळला. या अपघातात बसमधील ११ प्रवासी जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. स्थानिकांनी जखमींना शहापूर उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले.