
महाराष्ट्रात ऑक्टोबरमध्ये दुष्काळ स्थिती ठरणार
बातमी थोडक्यात
दुष्काळात तातडीने कार्यवाही करा, अशी विरोधकांची मागणी असताना ऑक्टोबरमध्ये दुष्काळ निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. दुष्काळग्रस्त गावांमध्ये स्थानिक प्राधिकरणांकडून पाण्याचे टँकर सुरू करता येतील. राज्यस्तरीय दुष्काळ निरीक्षण समिती आधीच स्थापन करण्यात आली आहे.