
अनधिकृत केबल काढण्याचे पिंपरीचे केबल ऑपरेटरना इशारा
बातमी थोडक्यात
नागरिकांच्या सुरक्षेला धोका आणि शहराच्या सौंदर्याला बाधा येत असल्याने अनधिकृत केबल काढण्याचे पिंपरी महापालिकेने केबल ऑपरेटरना तातडीने इशारा दिला आहे. महापालिकेच्या वतीने वर्षभरात भूमिगत केबल टाकण्याचे नियोजन असल्याने ओव्हरहेड केबल नियमन आणि प्रस्तावित एसओपीबाबत चर्चा करण्यासाठी ऑपरेटरची बैठक घेण्यात आली. स्वेच्छेने केबल काढल्या नाहीत तर कठोर कारवाई केली जाईल.