
निमगाव वाकड येथे रेणुका माता मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू
बातमी थोडक्यात
निमगाव वाकड येथील श्री रेणुका माता मंदिरातील कलश व जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोमवारपासून सुरू झाला. परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराचे शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमातून नूतनीकरण करण्यात येत आहे. सोमवारला निवृत्ती महाराज रायटे यांच्या हस्ते कीर्तन करण्यात आले असून येत्या काही दिवसांत आणखी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.