
राधानगरी धरणाचे तिसरे दार उघडले
बातमी थोडक्यात
राधानगरी धरणाचे तिसरे स्वयंचलित दार सोमवारी दुपारी २.२६ वाजता उघडले. खाजगी वीज प्रकल्पातील विसर्ग थांबवण्यात आल्याने हे दार उघडले. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून काही ठिकाणी पाऊस झाल्याने भात, ऊस आदी पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. भोगावती नदीच्या खोऱ्यात १,४२८ क्युसेक पाणी सोडण्यात आले.