
शिर्डी: दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक
बातमी थोडक्यात
शिर्डी: संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे शहरातील संभाव्य गुन्हेगारी कारवाया रोखण्यात आल्या असून पोलिसांनी ५० हजार ४२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरहाडे यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे.